Prabhakar Bidwe Reading his Poem

प्रभाकर बिडवे उर्फ प्राचार्य वि. भ. बिडवे

(०१ नोव्हेंबर १९२७ – २९ जानेवारी २०१५)
विख्यात मराठी कवी व लेखक, जन्म कोंढेज करमाळा तालुका. साक्षात्कार, बकुलफुले, आहुती हे त्यांचे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. ज्ञानेश्वरीवर त्यांनी शेकडो प्रवचने केली असून ते व्युत्पत्तीशास्त्रीय चिकित्सक होते. साप्ताहीक करमाळा वार्ता या वृत्तपत्राचे चार वर्षे त्यांनी संपादन केले असून दैनिक सकाळ, संचार, लोकमत, पुढारी या वृत्तपत्रातून लेखनही केले आहे. ग्राम सुधार समितीच्या वतीने १९९८ साली प्राचार्य बिडवे यांना पहिल्या करमाळा भूषण पुरस्काराने सन्मानीत केले होते.

रसग्रहण व कौतुक

आपलें काव्य मी वाचलें व तें मला फार आवडलेंहि. जीवनलहरी हा एक छोटा परंतु समर्थ असा काव्य प्रकार आहे. आपल्या भावदर्शना साठीं आपण त्याचा फार चांगला, परिणाम-कारक उपयोग केला आहे. काव्यतींल उत्कट, मृदुल असून तिचे विविध सूक्ष्म पदर उकलून दाखविणारे शब्दही तिच्याशी एकजीव झाले आहेत. अशा-सघ्या दुर्मिळ असलेल्या-काव्यलेखनाबद्दल एक रसिक म्हणून मी आपल्याला धन्यवाद देतों.

– कुसुमाग्रज

Kavi Kusumagrag

माझे वडील

पुरंदरचा कऱ्हेपठार ही इतिहासाची खाण आहे. सह्याद्री पर्वत रांगेची सोबत, कऱ्हाकाठाची जवळीक लाभलेल्या या मातीला इतिहासाचा गंध येतो. छत्रपत्री शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे पहिले ढोलावर टिपरु याच मातीत पडले. अवघड पुरंदराच्या साह्याने शत्रूला जेरीस आणत मावळ्यांना एकवटून आव्हाने उभे केले. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदरावर झाला. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडेराया, ५२ सरदारांच्या जीवावर तगलेल्या पेशवाईला कऱ्हाकाठान…

– अनिरुध्द बिडवे, मुलगा

आमचे सर

– -ज्ञानदेव कांबळे, विद्यार्थी